हातकागदाच्या वेडातून सुरू झाला प्रवास, जागतिक स्तरावर कार्याचे कौतूक 40 वर्षांच्या मेहनतीने बनले लष्कराचे एकमेव पुरवठादार
.....
![]() |
ओमप्रकाशजी अग्रवाल |
आजवर कुणीही न वापरलेले 50 विविध प्रकारचे फायबर वापरून हातकागद तयार करण्याचा प्रयत्न करताना बांबू, केळीचा बुंधा, जिरे, निवडूंग, तुळस,गवती चहा, इंग्रजी चिंच, केतकी आदींचे हातकागद तयार केले. वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी 40 कामगारांपा प्रशिक्षण दिले. 1982 पासून ते 90 च्या दशकापर्यंत देशातील प्रत्येक कोपऱ्यात नवरंग पेपर पोहोचवला. सुगंधी हातकागद बनवणारे ते देशातील एकमेव व्यावसायिक ठरले. त्या काळातील सुप्रसिद्ध कार्यक्रम सुरभीने या अभिनव उपक्रमाची नोंद घेतली. सिद्धार्थ काक यांनी घेतलेल्या मुलाखतीनंतर ओमप्रकाशी अग्रवाल हे नाव देशभरात पोहोचले. यानंतर केवळ हातकागद तयार न करता या कागदापासून ग्रिटींग्स, डायरी, लेटरपॅड्स बनवण्यावर अग्रवाल यांनी लक्ष केंद्रीत केले. राष्ट्रपती भवनातील विविध कार्यक्रमांसाठी लागणाऱ्या निमंत्रणपत्रिका, देशोदेशीच्या वकिलातीतील अधिकाऱ्यांना पाठवयाची पत्रे आदींसाठी कागदही अग्रवाल यांनी पुरवला. विशेष म्हणजे, पंतप्रधान कार्यालयासाठी असे साहित्य बनवण्याकरिता देशभरातून नमुने मागणवण्यात आले होते. त्या वेळी इंदिरा गांधी यांनीही अग्रवाल यांनी तयार केलेल्या हातकागदाची निवड केली.
....
जागतिक बहुमान
आपल्या क्षेत्रातील इतर व्यावसायिकांना कमी न लेखता त्यांचे प्रयोग जाणून घेण्यासाठी 80 च्या दशकापासूनच देशपातळीवरील आणि आंतरराष्ट्रीय कागद परिषदा आणि प्रदर्शनांमध्ये सहभाग नोंदवला. मुंबई, कलकत्ता आणि दिल्लीतील प्रदर्शनांमध्ये अनेक पुरस्कार पटकावले. फ्रंकफट येथे होणाऱ्या जागतिक दर्जाच्या वर्ल्ड आॅफ पेपर या प्रदर्शनात 2006,07 आणि 08 अशी सलग तीन वर्ष विजेत्याचा बहुमानही मिळवला. देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील तब्बल 15 बक्षीसे त्यांनी पटकावली.
.....
लष्काराची कौतुकाची थाप
वाढता उत्पादन खर्च, कागदाची वाढती किंमत या चिंतांनी त्रासलेल्या ओमप्रकाशजी यांनी 1990 पासून इतर व्यवसायांचा शोध घेण्यास सुरुवात केली. लष्काराला बोफोर्स तोफांसाठी लागणाऱ्या सीडी कप, बॉम्ब डिस्क, आणि विशिष्ट प्लेट्स आयात कराव्या लागत. त्या तयार करण्याचा चंग ओमप्रकाशजी यांनी बांधला. यातूनच लष्कराचे पुरवठादार होण्याचा निर्णय घेत असे साहित्य बनणारे विदर्भातील एकमेव व्यावासयिक बनण्याचा निर्धार केला. तो पूर्ण करण्यासाठी पुन्हा जोमाने तयारी केली. लष्कराच्या चंद्रपूर, भंडारा, पुणे, जबलपूर, भुसावळ, उटी आदी ठिकाणावरील कारखान्यांना ते असे साहित्य पुरवतात.
......
आणि कलामांची भेट झाली
20 सप्टेंबर 2004 रोजी चेन्नईतील डॉ. चेरिअन यांच्या रुग्णालयात अग्रवाल यांची बायपास शस्त्रक्रिया झाली. चेरिअन यांच्या स्टेम सेल लॅबच्या उद्घाटनासाठी दोनच दिवसांत तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम तिथे येणार होते. हे कळताच अग्रवाल यांनी त्यांची भेट घेण्याचा निश्चय केला. कलाम यांना भेट देण्यासाठी इंप्रेशन पद्धतीने तयार केलेले कलाम यांचे वडिल जैनलाबुदिन अब्दुल यांचे पोट्रेट तयार केले. मात्र, ऐनवेळी, अग्रवाल यांची प्रकृती ठिक नसल्यामुळे ही भेट टळली. मात्र, 2006 मध्ये पुन्हा भेटीचा योग जुळून आला. हातकागद आणि लष्काराला पुरवलेल्या साहित्यबाबत कलाम यांनी अग्रवाल यांचे कौतूक करून कामाची पूर्ण माहिती घेण्यासाठी अर्धा तास वेळही दिला.
No comments:
Post a Comment