Posts

चला वाचवू पश्चिम घाट

Image
पश्चिम घाटातील जैवविविधता टिकून राहावी, यासाठी अनेक भाषांतील वृत्तपत्रांसह  टीव्ही, रेडिओच्या माध्यमातूनही जनजागृती होत आहे. पश्चिम घाट वाचवणे अत्यावश्यक असून त्यासाठी योजावयाच्या उपायांच्या तसेच नेमलेल्या समित्यांसह गुंडाळलेल्या अहवालांबाबतही सातत्याने बातम्या येतात. मात्र, पश्चिम घाटाचे नेमके स्वरूप, तेथील जैवविविधता वाचवणे का आवश्यक आहे, याबाबत नव्या पिढीला परिपूर्ण माहिती मिळावी, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. ते स्वरूप समजल्याशिवाज तुमची माझी पिढी हा घाट वाचवण्याबाबत सजग होणार नाही. अर्थात नेटसॅव्ही मंडळी निरनिराळ्या माध्यमांतून पश्चिम घाटांबाबत माहिती देत आहेत. मात्र, ती एकाच ठिकाणी संकलीत केलेली नसल्यामुळे तुकड्यातुकड्यांतून मिळणारी माहिती अपुरी ठरत आहे. मागच्या रविवारी म्हणजेच १४ सप्टेंबर रोजीच्या मराठी वृत्तपत्रांच्या पुरवण्यांमधून हा विषय पुन्हा चर्चिला गेला. नििमत्त होते केंद्रातील आघाडी शासनाप्रमाणेच मोदी सरकारमधील पर्यावरण व वनखात्याचे मंत्री प्रकाश जावडेकर यांनी घेतलेल्या निर्णयांचे. दै. दिव्य मराठीच्या रसिक पुरवणीमध्ये अभिलाष खांडेकर यांनी म्हटले होते, जावडेकरां...

करंटेपणाने लादला दुष्काळ

पुढच्यास ठेच मागचा शाहणा या म्हणीचा अर्थ समजून न घेण्याच्या आपल्या वृत्तीने सलग दुसऱ्यांदा अवघा मराठवाडा दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा आहे. जलसंकट परतवण्यासाठी फारसे प्रयत्न न केल्यामुळेच पाण्यासाठी तोंड वेंगाडण्याची वेळ आपल्यावर आली आहे. या संकटाला फक्त राज्यकर्तेच नव्हे तर तुम्ही-आम्हीसुद्धा तितकेच जबाबदार आहोत. ....... हे नाही...ते नाही असं म्हणत शासनाच्या नावानं खडे फोडण्याची सवयच आपल्याला लागली आहे. खड्डा पडला शासनानेच दुरुस्त करावा, पाऊस नाही झाला शासनानेच नुकसान भरपाई द्यावी अशा सवयींनी आपण पंगू होत आहोत, याची जाणीवही आपल्याला राहिलेली नाही. दोन वर्षांपूर्वी संपूर्ण मराठवाडा दुष्काळाच्या चटक्यांनी भाजून निघाला. गावागावात छावण्या सुरू झाल्या, दुष्काळी कामं सुरू झाली... वगैरे वगैरे. पण, हे संकट का ओढवलं, याचा विचार आपण केलाच नाही. मराठवाड्यातील दोन-पाच शहाणीसुरती गावं सोडली तर इतर बहुसंख्य गावं आज पुन्हा टंचाईच्या उंबरठ्यावर आहेत. वर ज्या दोन-पाच गावांचा उल्लेख केला, त्या गावांमध्ये जलसंवर्धनाचे प्रयत्न झाल्यामुळे आपले भाऊबंद टंचाईच्या जोखडातून मुक्त झाले. त्यांची...

यवतमाळ शहरातील 78 वर्षांच्या तरुणाची यशोगाथा

Image
  हातकागदाच्या वेडातून सुरू झाला प्रवास, जागतिक स्तरावर कार्याचे कौतूक 40 वर्षांच्या मेहनतीने बनले लष्कराचे एकमेव पुरवठादार 70 च्या दशकात केमिकल इंजिनियरिंग पूर्ण केल्यानंतरही गलेलठ्ठ पगाराची नोकरी लाथाडून एक तरुण परंपरात व्यवसायात रमला. या ध्येयवेड्याने 40 वर्षात स्वत:चा मूळ व्यवसाय भरभराटीला आणतानाच हातकागदाच्या क्षेत्रात ग्लोबल भरारी घेतली. यानंतरही तिथेच अडकून न पडता थेट लष्कराला विशिष्ट प्रकारच्या पुठ्ठ्यांचा पुरवठा करण्याचा प्रकल्प उभारून विदर्भातील एकमेव पुरवठादार होण्याचा मान मिळवला. ‘आंत्रप्रिनर’ हा शब्द रक्तात भिनलेल्या आणि व्यावासायिकाची कामात झोकून देण्याची वृत्ती आयुष्यभर अंगी बाणवणा ऱ्या त्या उद्योजकाचे नाव आहे, ओमप्रकाशजी अग्रवाल.1947 मध्ये जन्मलेल्या ओमप्रकाशजी यांनी केमिकल इंजिनियरींग पूर्ण केल्यानंतर मुंबई आणि नागपूरातील काही बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम केले. मात्र, परंपरागत व्यवसाय सांभाळण्यासाठी त्यांनी या नोकरीकडे पाठ फिरवली. 100 वर्षांपासून सुरू असलेल्या स्टेशनरीच्या व्यवसायात बदलत्या काळानुसार अनेक बदल केले. पुरवठादारांवर अवलंबून न राह...